Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot


मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महिला महाविद्यालय अभ्यासकेंद्र- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ,अक्कलकोट

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे ब्रीद वाक्य असलेले "ज्ञानगंगा घरोघरी" पोहोचवण्यासाठी विद्यापीठाने ३८०० अभयाकेंद्राची स्थापना केली. विद्यार्थी व विद्यापीठ यांना जोडणारा दुवा म्हणून अभ्यासकेंद्राची स्थापना करण्यात आली. अशा अनेक अभ्यासकेंद्रामध्ये अक्कलकोट तालुक्यातील पहिलेच अभ्यासकेंद्र म्हणून मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महिला महाविद्यालय, अक्कलकोट या संस्थेत सन १९९९ साली अभ्यासकेंद्राची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष कै. पंचप्पा कल्याणशेट्टी सर यांनी केले. प्रा चव्हाण एम.आर. केंद्र संयोजक यांनी सुरुवातीपासूनच विद्यापीठाचे "ज्ञानाची गंगा घरोघरी" पोहोचविण्याचे कार्य अत्यंत प्रभावीरीत्या पार पाडले.

  • अभ्यासकेंद्र स्थापन झालेल्यावेळी प्रवेशर्थींची संख्या बोटावर मोजण्या इतकी होती. केंद्रप्रमुख कल्याणशेट्टी एम.टी. व केंद्रसंयोजक प्रा.चव्हाण एम.आर. यांच्या व्यतिरिक्त प्रा.एम.व्ही.भरमशेट्टी सर आदींनी देखील ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवून प्रवेशर्थी संख्या वाढविण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाऊन २०१५-१६ साली १७५९ प्रवेशर्थीनी प्रवेश घेतला आहे.

  • अभ्यास केंद्रात मुस्लिम बांधवांना उर्दू माध्यमातून पदवी पर्यंतचे शिक्षण घेता यावे व त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांच्या शिक्षणाची सोया व्हावी म्हणून संस्थेने या अभ्यासकेंद्रात पूर्वतयारी व बी.ए. या शिक्षण क्रमांचे उर्दू माध्यमाची स्थापना करून त्यांना शिक्षणाचे दार मोकळे करून दिले. आज या माध्यमातून बी.ए. प्रथम वर्षांमध्ये ४९ प्रवेशर्थीनी प्रवेश घेतला आहे.तर बी.ए. भाग दोन मध्ये ५६ प्रवेशर्थी आहेत. बी.ए. भाग ३ मध्ये २९ प्रवेशर्थी उर्दू माध्यमातून समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र इत्यादी विषयाचे विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी सोया करून देण्यात आले आहे.

  • तसेच आमच्या अभ्यासकेंद्रात यं.च.म.मु.वि.विद्यापीठ नाशिक तर्फे चालविण्यात येणाऱ्या डी.एस.एम(शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम) केंद्राची स्थापना करण्यात आली. याचा फायदासेवेत असणाऱ्या शिक्षकांना झाला . सन २०१२-१३ साली या शिक्षणक्रमाची स्थापना करण्यात आली. या शिक्षणक्रमाचे उदघाटन सोलापूर विभागीय केंद्राचे संचालक डॉ.शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांकडून भरपूर प्रतिशत देखील मिळाला. प्रवेश मर्यादित असल्यामुळे ६० प्रवेशार्थीना प्रवेश दिला जातो.

  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणी शंकांची सोडवणूक करणारी व्यक्ती म्हणजे मार्गदर्शक/प्राध्यापक होय.आमच्या अभ्यासकेंद्रात एकूण ५३ संमत्रक मार्गदर्शक/प्राध्यापक कार्यरत आहेत. तसेच सौ. सरोज हरकूड(चिट्टे) व सौ. जयश्री यळसंगकर सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ६ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.

  • पूर्वतयारी पासून बी.ए./बी.कॉम , डी.एस.एम च्या प्रवेशार्थीना दर रविवारी मार्गदर्शक/प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाते.

  • दर वर्दी आमच्या अभ्यासकेंद्रातून(य.च.म.मु.वि.) २०० ते ३०० विद्यार्थी पदवी संपादन करतात.निकालाची परंपरा ८० ते ९० टक्के आहे. विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची सोया आहे. भविष्यात एम.ए./बे.एड शिक्षणक्रम राबविण्याचा मानस आहे. मुक्त विद्यापीठातील व्यवहार राष्ट्रीयकृत बँकेमार्फत केले जात असून दरवर्षी सनदी लेखापालाकडून लेखापरीक्षण केले जाते.