Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot

वीर शिरीष कुमार बालसंस्कार केंद्र,अक्कलकोट.

वीर शिरीष बालसंस्कार केंद्र, अक्कलकोट या केंद्राची स्थापना २००५ ला करण्यात आली. बालचिमूकल्यना संस्थेच्या वतीने खेळणी, खाऊ, गरीब व होतकरु मुलांना मोफत गणवेश दिले जाते २००९ साली संस्थेचे श्री. राचप्पा वागदरे सरांनी बालवाडी वर्गासाठी काही खेळण्या, बडबडगीतांचे कॅसेट, CD सरांच्या वतीने देण्यात आले तसेच प्राण्यांची, पक्ष्यांची पुस्तके देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गतवर्षीप्रमाणे यंदा हि वार्षिक स्नेहसंमेल्लनाचे आयोजन केले जाते. त्या नवनवीन गीतावर बालचिमुकले नृत्य करून दाखवितात. दरवर्षी याहून अधिक उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यासाठी आदर्श शाळांना भेट देऊन विविध माहितीचे संकलन केले जाते. त्या आधारावर विद्यर्थ्यांचा सर्वागीण विकास कसा होईल याकडे वैयक्तिक लक्ष देता येते.


खेळणीचा उपयोग व चार्टचा उपयोग

  1. प्राण्यांचे प्रतिकृतीचा उपयोग मुलांना प्राण्यांची ओळख व्हावी.
  2. विमानाचा उपयोग कशासाठी होतो हे मुलांना पटवून सांगणे.
  3. जंगली प्राण्यांची ओळख करून देणे व त्याबद्दल माहिती सांगणे.
  4. शरीराचे उपयोग व विविध भागांची माहिती देणे.
  5. दैनंदिन जीवनातील सकस आहार याची माहिती व उपयोग.
  6. १ ते १० पर्यंत संख्यांची ओळख सांगण्यात मुलांना प्रवृत्त करणे.
  7. विविध प्रकारचे रंग व विविध रंगांविषयी माहिती सांगणे.
  8. चिमुकल्या व बालकलाकार मुलांना विविध प्रकारचा आवाज ऐकवणे.
  9. इंग्रजी Capital -ABCD(A to Z) शिकवणे व मुलांकडून वदवून घेणे.
  10. मुलांना दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी व दहा चाकी वाहनांबद्दल माहिती सांगणे व त्यांना वाहनांची ओळख करून देणे
  11. बालचिमुकल्याना फळांविषयी माहिती सांगणे, चव विचारणे
  12. चिमुकल्याना पक्षांविषयी सखोल माहिती व ज्ञान देणे.
  13. विद्यार्थ्यांना थोर व्यक्तीबद्दल मेथी व त्यांनी केलेले कार्य याविषयी ज्ञान देणे/ माहिती सांगणे.
  14. स्वच्छता कशी राखावी व स्वच्छतेविषयी माहिती देणे.
  15. शिक्षक व मोठ्या व्यक्तीशी आदर कसा बाळगायचा व मोठ्या व्यक्तीशी कसे बोलायचं यांच्याबद्दल माहिती सांगणे.
  16. नाजूक फुलविषयी माहिती सांगणे.
  17. शाळेच्या गणवेशाबद्दल माहिती सांगणे.
  18. मुलांना कळेल अशाप्रकारे छान छान गोष्ट सांगणे.
  19. डान्ससहित बडबडगीत शिकवणे.
  20. मुलांचा/चिमुकल्यांचा हसत खेळात अभ्यास घेणे.
  21. आठवड्यातील वारांची नावे सांगणे व त्यांच्याकडून वदवून घेणे.
  22. मराठी महिन्यांची ओळख, त्याबद्दल माहिती सांगणे.
  23. शरीराचे वाढ कशापद्धतीने होते यावर मुलांना माहिती सांगणे.
  24. आपला पोशाख या चार्टद्वारे मुलांना त्या पोशाखाविषयी माहिती सांगणे व तो पोशाख कशापासून तयार हतो याबद्दल माहिती सांगणे.
  25. मुलांना फळभाज्यांविषयी माहिती सांगणे.
  26. मातीपासून विविध आकाराच्या भांडी तयार करुन दाखविणे व त्या बद्दल माहिती सांगणे
  27. मुलांना फळभाज्यांविषयी माहिती सांगणे.
  28. मुलांना इंद्रियांविषयी माहिती सांगणे.
  29. बालकलाकारांच्या खेळ कवायत घेणे.
  30. पालकांना बोलावून बालचिमुकल्याच्या वागणुकी बद्दल सांगणे.