Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot


सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अक्कलकोट, जि. सोलापूर

  • सौ. सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अक्कलकोट, जि. सोलापूर अक्कलकोट येथील महर्षी विवेकानंद संजकल्याण संस्थेने १९९१ मध्ये सुरु केलेल्या सौ.सुरेखा काळ्यांचेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ. ५ वी ते १२ वी पर्यंत वर्ग असून मराठी व कन्नड या दोन्ही माध्यमातून शिक्षण दिले जाते. शै. वर्ष २०१५-१६ या वर्षात एकूण ७७८ विद्यार्थी शिक्षण घेत असुन १९ शिक्षक व ५ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.

  • अभ्यासाबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा, स्पर्धा परीक्षा, विज्ञान मंडळ, पर्यावरण संवर्धन, शैक्षणिक सहल, संगीत व चित्रकला,वाङ्‍‍मय मंडळ, आरोग्य मंडळ इत्यादी विभागाकडून विविध उपक्रम राबविले जातात. याशिवाय दैनंदिन मूल्यशिक्षण, दिनविशेष,थोर व्यक्तींच्या जयंती-पुण्यतिथी, प्रश्नमंजुषा, राष्ट्रीय सण, साक्षरता दिंडी, राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त १२ जानेवारीला शहरातून भव्य-दिव्य अशी ग्रंथ दिंडी काढली. राष्टीय एकात्मता, राष्ट्रीय स्वच्छता अभियान, ऐतिहासिक व भौगोलिक माहिती व्हावी म्हणून दरवर्षी शैक्षणिक सहलीचे नियोजन, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी, विज्ञान प्रदर्शनात सहभाग, वेळोवेळी तज्ज्ञांचे व्याख्यानं विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी विशेषतः मुलींच्या समस्येवर समुपदेशिक सौ.प्रीती श्रीराम,सोलापूर यांचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकास साधण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.

  • क्रीडा विभागात कु.उजमा गवंडी, कु. मीनाक्षी पाटील या मुलींची राज्यस्तरीय धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली असून हि कौतुकाची बाब आहे. गतवर्षी माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल ९१.९४ टक्के लागला असून कु. माहेश्वरी पाटील व कु. गंगुबाई टोणगे या दोघी मुली ८० % गुण घेऊन प्रथम आल्या आहेत. तर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८१ % लागला असून कु. मनीषा गायकवाड हि ८० % गुण मिळवून प्रथम आली आहे.

  • संस्थापक अध्यक्ष कै.पंचप्पा कल्याशेट्टी यांनी २०१५-१६ पासून १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी डे-स्कुल सुरु करण्याची कल्पना मंडळी व जून २०१५ पासून डे-स्कुल सुरु केली. यामुळे मुलांना योग-प्राणायाम बरोबरच औषध वनस्पतींचे सेवन तसेच मैदानी खेळामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकास झाल्याचे दिसून आले.