Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot


गिरिजामाता प्राथमिक मराठी विद्यालय, अक्कलकोट

आमच्या अक्कलकोट येथील महर्षी विवेकानंद संजकल्याण संस्थेने सुरु केलेल्या गिरिजमता प्राथमिक मराठी विद्यालयाची स्थापना १९९५ साली झाली असून येथे इ. १ ले ते ५वी पर्यंतचे वर्ग आहेत. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात एकूण ३३३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मल्लिनाथ कल्याणशेट्टी व प्रशाळेतील ज्येष्ठ शिक्षक मालकाप्पा भरमशेट्टी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तक वाट करण्यात आले.



  • मागील शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या परीक्षेत इ. १ली ते ५वी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आमची शाळा नेहमीच प्रयत्नशील असते. गुणवत्ता वाढीसाठी इ.३री व इ.४थ च्या सर्व विद्यार्थाना शिष्यवृत्ती व MTS परीक्षेसाठी विषय निहाय स्वतंत्र शिक्षक नेमून नियमित तास घेतले जातात.

  • अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून वर्षभरात शालेय व सहशालेय उपक्रमांचे आयोजन करतो. यावर्षी राष्ट्रीय सण, थोर पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, शिक्षक दिन, साक्षरता दिन, महिला दिन, साक्षरता अभियान, पर्यावरण संवर्धन इ.कार्यक्रम राबविले जातात.

  • क्रिडा विभाग हा आमच्या विद्यालयातील अत्यंत महत्वाचा विभाग असून आमच्या शाळेत आम्ही दार वर्षी क्रिडा मेळावा आयोजित करतो. यात धावणे, कबड्डी, लंगडीमलिंबू चमचा, संगीत खुर्ची, दोरी उडी यासारखे खेळ घेण्यात येतात. त्यात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते.

  • इतिहास,भूगोल व पर्यावरणाचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी दरवर्षी आमच्या विद्यालयाची सहल ऐतिहासिक व पर्यटन स्थळी आयोजित केली जाते.

  • आमच्या प्राथमिक शाळेत वृक्षारोपण या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी त्या-त्या विद्यार्थ्यांकडे दिलेले आहे. आज आमच्या या शाळेभोवती असणारी झाडे हि विद्यार्थ्यांकडून लावलेली आहेत आणि रोज हि मुले या झाडांना पाणी घालून जोपासतात. ग्रामीण रुग्णालयामार्फत दर वर्षी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते.