Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot


मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी कला व वाणिज्य महिला महाविद्यालय

  • अक्कलकोट तालुक्यात उंचच शिक्षण घेणाऱ्या मुलींची संख्या अधिक आहे. पालकांची मागणी लक्षात घेता मुलींना निर्भयपणे शिक्षण घेता यावे म्हणून स्वतंत्र महिला महाविद्यालय सुरु करण्याचा संस्थापक कै. पंचप्पा कल्याणशेट्टी यांचा मानस होता. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना तालुक्यातच पदवी शिक्षण घेता यावे म्हणून अक्कलकोट शहरात सन २००८ साली महिला महाविद्यालय सुरु केले.

  • सन २००८ पासून महिला महाविद्यालय सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यनाच्याशी संलग्नित आहे.या महिला महाविद्यालयात केवळ मुलींनाच प्रवेश असून पदवी शिक्षणक्रम मराठी,कन्नड व उर्दू या माध्यमातून पदवी घेण्याची सोया आहे.

  • महिला महाविद्यालयात यावर्षी एकूण १५ मुली प्रवेशित आहेत. यातील मागासवर्गीय व अल्पसंख्याक मुलींनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत.

  • विद्यार्थी मंडळ स्थापन केले असून महाविद्यालयातील प्रतिनिधींची रीतसर निवड केलेली आहे.विद्यापीठ नियमानुसार विविध समित्या स्थापन केले असून त्यात अल्पसंख्यांक समिती,मागासवर्गीय समिती,स्थानिक व्यवस्थापन समिती, लैंगिक छळ प्रतिबंधक समिती,तक्रार निवारण समिती आदी समित्यांच्या वेळोवेळी बैठका होऊन त्यात निर्णय केले जातात.

  • क्रीडा, सांस्कृतिक व विविध सामाजिक,राष्ट्रे उपक्रम उदा,स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान, पल्स पोलिओ, वन संवर्धन, पाणी वाचावा अभियान यासारखे उपक्रम वेळोवेळी महाविद्यालयात राबविले जातात. तसेच देशातील थोर नेत्यांच्या जयंती व पुण्यतिथी सुद्धा साजरे केल्या जातात.