Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot Maharshi Vivekanand Samajkalyan Sanstha, Akkalkot


Kalyanshetti sir
कै. पंचप्पा कल्याणशेट्टी सर.

संस्थापक


अध्यक्षीय मनोगत

                    आमच्या संस्थेला इतक्या उत्तुंग शिखरावर नेण्यात ज्यांचा सिंहाचा वाट आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पंचप्पा ति. कल्याणशेट्टी यांच्या स्मृतीस सर्वप्रथम विनम्र अभिवादन ! ते म्हणायचे, ' सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला यशाच्या हव्या तेवढ्या उंचीवर पोहोचवू शकतो '.

                    ३१ डिसेंबर १९७० रोजी संस्थेची रीतसर नोंदणी करून सामाजिक कार्याचे लहानसे रोपटे लावले गेले. बदलत्या परिस्थितीला प्रतिसाद देऊन विविध आव्हानांचा स्वीकार करीत या संस्थेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे यशस्वीरीत्या वाटचाल सुरु असून आज त्या रोपट्याचे प्रचंड वृक्षात रूपांतर झाले आहे. त्याची पाळेमुळे आता महाराष्ट्रात रुजू लागली आहेत. महाराष्ट्रातील अग्रगण्य व लोकाभिमुख संस्थांसोबत आमची संस्था आज कार्यरत आहे.

                    संस्थेच्या ग्रामीण विकासातील प्रदीर्घ अनुभव व संस्थेकडे तज्ञ व कुशल मनुष्यबळ यामुळे केंद्रशासन, राज्यशासन इत्यादींकडून अनेक योजना राबविण्यासाठी विविध उपक्रमास मान्यता देण्यात आली आहे. आज संस्था शैक्षणिक ,सामाजिक, ग्रामीण विकास, आरोग्य, क्रीडा, महिला सक्षमीकरण, प्रशिक्षण, जलसंधारण , आर्थिक, व्यावसायिक अशा विविध उपक्रमात राज्यभर कार्यरत आहे. संस्थेकडे आज दोनशेपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.या व्यतिरिक्त सामूहिक विवाह, रद्दीतून शिक्षण, गणेशोत्सव व्याख्यानमाला,तलाव व विहिरीतील गाळ काढणे, अध्यात्मिक प्रवचन यासारखे उपक्रमही आमची संस्था राबवित आहे. मा.अण्णा हजारे, मा.कै. मोहनजी धारिया, मा. कै. मुकुंदजी घरे याशिवाय प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संस्थेला भेट देऊन कार्याचा गौरव केला आहे. तत्कालीन राज्यपाल दिवंगत पी.सी.अलेक्झांडर यांनी देखील संस्थेच्या कामाचा गौरव केला आहे. संस्थेच्या कार्यात पारदर्शकता,उत्तम प्रशासन, सांजप्रती उत्तरदायित्व या मूल्यांचा अवलंब व्हावा, यासाठी संस्था विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे.

                     संस्थेचे एवढ्यावरच समाधान झालेले नाही, अजून बरेच काही करावयाचे आहे. त्यासाठी संस्थेच्या बऱ्याच संकल्पना आहेत. त्या लवकरच पूर्ण होतील अशी आशा आहे.त्यासाठी संस्थेचे पदाधिकारी,सदस्य, कर्मचारीवर्ग व हितचिंतक यांच्या सक्रिय सहभागाने निश्चितच हे सध्या होईल, यात तिळमात्र शंका नाही.

धन्यवाद !

सचिन पं. कल्याणशेट्टी

Sachin Kalyanshetti